IPL 2026 CSK vs PBKS | चेन्नई आणि पंजाब आमनेसामने ! ऋतुराज, सॅमसनवर CSK चा बालेकिल्ला अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी

एम.ए चिदंबरम स्टेडियममध्ये  चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना खेळला जाणार आहे.

IPL 2026 CSK vs PBKS | चेन्नई आणि पंजाब आमनेसामने ! ऋतुराज, सॅमसनवर CSK चा बालेकिल्ला अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी

आयपीएल 2026 ची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज चेन्नईतील एम.ए चिदंबरम स्टेडियममध्ये  चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना खेळला जाणार आहे.  पंजाबने गुजरात टायटन्सला मात देत पहिल्याच सामन्यात विजय नोंदवला, पण चेन्नईला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. धोनी आणि ब्रेव्हिस या दोघांची उणीव चेन्नईला जाणवली. चेन्नईची फलंदाजी राजस्थानच्या गोलंदाजीसमोर विस्कळीत झाली. ब्रेव्हिसच्या जागेवर खेळणारा मॅट शॉर्ट खास काही करू शकला नाही. ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन आणि आयुष्य म्हात्रेदेखील जास्त प्रभाव टाकू शकले नाहीत. चेन्नई 100 धावांचा आकडादेखील पार करू शकणार नाही असं वाटत होतं. चेन्नईला विजयी घोडदौड सुरु करायची असेल, तर चेन्नईच्या फलंदाजांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त चांगली कामगिरी करावी लागेल. चेन्नईची गोलंदाजी ऑनपेपर हलकी दिसते, पहिला  सामना  चेन्नईने पॉवरप्लेमध्येच गमावला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वैभव सूर्यवंशीच्या  फलंदाजीसमोर चेन्नईची गोलंदाजी दुबळी ठरली. आयपीएलचा हा हंगाम सुरु व्हायच्या आधीच त्यांच्या लिलावाच्या रणनीतीवर शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्या शंका खऱ्या होत्या की चेन्नई संघाची रणनीती भक्कम होती हे आयपीएल जसजसं पुढे जाईल तसं कळत जाईल. 

हेही वाचा –IPL 2026: 'सिक्सर किंग' अभिषेक शर्माचा KKR विरुद्ध झंझावात! रोहित शर्माच्या विक्रमाशी साधली बरोबरी, रचला षटकारांचा 'त्रिशतकी' इतिहास 

दुसरीकडे पंजाबचा संघ परिपूर्ण आहे. पंजाबकडे उच्च दर्जाचे खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे खेळाडूंच्या बाबतीत विविधतादेखील आहे. अष्टपैलू खेळाडू ही पंजाबची मुख्य ताकद ठरते. त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करणार अष्टपैलू खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडूंच्या असण्याने फलंदाजी आणि  गोलंदाजी वाढते, अधिक पर्याय निर्माण होतात. पंजाबसाठी कूपर कॉनली महत्त्वाचा ठरतो. गुजरातविरुद्धचा सामना पंजाबच्या बाजूने वळवण्यात कॉनलीचा सिंहाचा वाटा होता. श्रेयस अय्यर त्याचा कसा वापर करतो? हे निर्णायक ठरेल. गेल्या वर्षी प्रियांश आर्याने चेन्नईविरुद्ध शतक मारले होते. यावेळीदेखील तशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची आशा पंजाबच्या चाहत्यांना आणि संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून असेल. 

हेही वाचा  IPL 2026: IPL सामन्यादरम्यान मोठा वाद, RCB च्या खेळाडूने ठोठावला न्यायालयाचा दरवाजा; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा  

खेळपट्टी आणि परिस्थिती 

  • टी-20 विश्वचषकादरम्यान चेन्नईची खेळपट्टी, विशेषतः वेगवान गोलंदाजांसाठी, अत्यंत त्रासदायक ठरली. शुक्रवारी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. याच खेळपट्टीवर भारताने टी-20 विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध 4 गडी गमावून 256 धावा केल्या होत्या.

हायलाईट्स 

  • आयपीएलमध्ये दोन्ही संघ प्रत्येकी 16 विजय आणि 16 पराभवांसह बरोबरीत आहेत. मात्र, 2022 पासून पीबीकेएसने पाच सामने जिंकले आहेत, तर सीएसकेने फक्त एकच सामना जिंकला आहे.
  • युझवेंद्र चहलने चेन्नईमध्ये सीएसकेविरुद्ध खेळताना हॅट्रिक घेतली होती. आयपीएलमध्ये त्याने चेन्नईविरुद्ध 7.1 च्या इकॉनॉमी रेटने 23 बळी घेतले आहेत चहलने 12 डावांमध्ये संजू सॅमसनला पाच वेळा केवळ 61 धावांत बाद केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number